बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 20 एप्रिल 2022 (08:35 IST)

काँग्रेस मोदी सरकावर निशाणा साधण्यासाठी भोंग्यांचा वापर करणार

काँग्रेस पक्ष देखील आता महागाईच्या मुद्य्यावरून मोदी सरकावर निशाणा साधण्यासाठी भोंग्यांचा वापर करणार आहे. कारण, “मोदींच्या ‘अच्छे दिना’चे पाढे काँग्रेस पक्ष ठिकठिकाणी भोंग्यांवर वाचणार आहे. तसेच, २०१४ मधील महागाईची ‘मोदी कथा’ काँग्रेस पक्ष भोंग्यांवरुन लवकरच प्रसारित करणार आहे.”, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
 
तसेच “आम्ही काल पुण्यात प्रक्रीया सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी २०१४ ची भाषणं होती, तीच भाषण आता आम्ही जनतेसमोर वाजवतो आहोत. जे काही जुमले…,जुमलेबाजांनी दिलेत. कारण जुमला हा शब्द देखील त्यांचाच आहे. जुमला शब्द आमचा नाही या जुमलेबाजांनी जे शब्द दिले आणि ज्या पद्धतीने देशाच्या जनतेला स्वप्न दाखवलं, ५६ इंचाची छाती दाखवली आता ती कुठं गेली माहिती नाही. या सगळ्या व्यवस्थेबद्दल लोकांच्या मनात तीव्र चीड आहे. आज सर्वसामान्यांचं जगणं कठीण करण्याचं पाप केंद्रातील भाजपा सरकारने केलेलं आहे. त्याविरोधात काँग्रेस आंदोलन करतच आहे पण आता हे आंदोलन तीव्र करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे.” असं नाना पटोले यांनी बोलून दाखवलं आहे.