सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2022 (08:05 IST)

बीड गोळीबार प्रकरण; क्षीरसागर पिता - पुत्राच्या अडचणीत वाढ

court
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर आणि सेना नेते डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हा सञ न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन फेटाळला आहे.
 
जमिनीच्या वादावरुन क्षीरसागर परिवारात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळीबार झाला होता. यानंतर दोन्ही गटावर गुन्हे नोंद करण्यात आले होते. या प्रकरणात चार दिवसाची मुदत देण्यात यावी अशी मागणी अर्जात करण्यात आली होती. परंतू जिल्हा सञ न्यायालयाने अर्ज फेटाळल्यामुळे भारतभुषण क्षीरसागर व योगेश क्षीरसागर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.