मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: वाशिम , मंगळवार, 19 एप्रिल 2022 (21:51 IST)

.'या’महिन्यात ठाकरे सरकार कोसळणार, राणेंची भविष्यवाणी

uddhav narayan rane
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये राज्यातील ठाकरे सरकार कोसळेल, असा नवा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
 
वाशिममध्ये एका आयोजित पत्रकार परिषदेत राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, आमच्याकडे कोकणात मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला वादळ येतं. या वादळात हलणारी झाडं फांद्यांसारखी कोसळून पडतात. राज्यातील सरकार म्हणजे तीन पक्षांचं एक झाड आहे. या झाडाच्या फांदीवर मुख्यमंत्री आहेत. ते खोडावर नाहीत. त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये जाणार आहे.
 
संजय राऊत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, संजय राऊतांबद्दल प्रश्न विचारु नका. त्यांना मी पत्रकार मानत नाही आणि संपादक तर नाहीच नाही. त्यांची भाषा आणि वैचारिकता बघा. काळ्या पैशाने घेतलेली त्यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अशा माणसांना मी किंमत देत नाही, असेही राणे म्हणाले.