मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2022 (08:16 IST)

शिवसेना, मनसे यांच्याकडून अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु

raj thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे  5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. कार्यकर्त्याना अयोध्येत जाण्यासाठी मनसेकडून ट्रेन बुक करण्यात येणार आहे. 10 ते 12 ट्रेन बुक करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
 
दुसरीकडे शिवसेनाही  अयोध्या दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे  अयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेना भवनात खासदार संजय राऊत  आणि युवासेना सचिव वरूण सरदेसाई  यांच्यात चर्चा झाली. या दौऱ्याच्या निमित्तानं अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचं नियोजन आहे. यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक जाणार असून त्यासाठी रेल्वे बुक केल्या जाणार आहेत.