शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 10 एप्रिल 2022 (13:15 IST)

शिवसेना भवनाबाहेर मनसेचे हनुमान चालिसाचे पठण, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त

महाराष्ट्रात लाऊडस्पीकरच्या वक्तव्या वरून वाद वाढत आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) रामनवमीनिमित्त शिवसेना भवनाबाहेर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण केले. त्यानंतर शिवसेना भवनाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याला झालेल्या सभेत मशिदीं वरून लाऊडस्पीकर काढून टाका, अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात कायद्याचे राज्य चालणार असल्याचे म्हटले होते.

एका सभेला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, मी नमाजच्या विरोधात नाही, मात्र मशिदीवरील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, असे राज ठाकरे म्हणाले. मी फक्त एक इशारा देत आहे. लाऊडस्पीकर काढा नाहीतर मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवू . ते म्हणाले की, उत्तर प्रदेशची प्रगती होत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. महाराष्ट्रातही असाच विकास हवा आहे. अयोध्येला जाईन, पण कधी जाणार हे सांगणार नाही, हिंदुत्वावरही बोलेन. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे.
 
राज ठाकरे यांच्या लाऊड स्पीकरच्या वक्तव्यावर राज्यात त्यांचे प्रतिसाद उमटून येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील घाट कोपर व्यतिरिक्त नाशिक मध्ये एमएनएस च्या कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकर वर हनुमान चालीसा वाजविण्यास सुरु केले. या प्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाजात तेढ निर्माण होईल असे प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.