शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025 (11:57 IST)

विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली आज नागपुरात ओबीसी शक्तीप्रदर्शन; भुजबळही सहभागी होऊ शकतात

maharashtra news
मराठा आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी महाराष्ट्रात वाढत आहे. काँग्रेस आज या प्रकरणी ओबीसी समुदायासोबत शक्तीप्रदर्शन करण्याची योजना आखत आहे. भुजबळही सहभागी होऊ शकतात. अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील ओबीसी समुदायाने आरक्षणावरून महायुती सरकारविरुद्ध निषेध सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात काँग्रेसचा महामोर्चा शुक्रवारी प्रमुख ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येत आहे. हा मोर्चा दुपारी १२ वाजता यशवंत स्टेडियमपासून सुरू होईल आणि समारोप समारंभ संविधान चौकात होणार आहे.

ओबीसी नेते मराठा समाजासाठी हैदराबाद राजपत्राला मान्यता देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या जीआर रद्द करण्याची मागणी करत आहे. या जीआरनुसार, पात्र मराठा सदस्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली जात आहे.  ओबीसी समुदाय याचा निषेध करत आहे. त्यांचा आरोप आहे की याचा ओबीसी कोटा आरक्षणावर परिणाम होईल.

विदर्भातील ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. वडेट्टीवार म्हणाले की, या कार्यक्रमात विदर्भातील ओबीसी समाजातील लाखो लोक सहभागी होतील. "मी सर्व ओबीसी नेते आणि बांधवांना त्यांच्या भावी पिढ्यांच्या न्यायासाठी या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो," वडेट्टीवार म्हणाले. "ओबीसी समाजाला बाजूला ठेवण्याच्या या सरकारच्या कारस्थानाला पूर्णपणे उखडून टाकण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे."
भुजबळांच्या सहभागाबद्दल सस्पेन्स
नागपूरमध्ये झालेल्या ओबीसी मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या सहभागाबद्दल सस्पेन्स आहे. अलिकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळांच्या वृत्तीवर नाराजी व्यक्त केली. 
Edited By- Dhanashri Naik