1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Controversy in Gautami Patil Show in Khed

Gautami Patil गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा राडा!

लावणी क्वीन म्हणून प्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटील काही न काही कारणांमुळे चर्चेत असते. मात्र आता पुण्यातील खेड तालुक्यातील भैरवाडी येथे गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमात पुन्हा एकदा काही तरुणांकडून धुडगूस घालण्याचा प्रयत्न करण्यात आला असून आयोजकांना हा कार्यक्रम थांबविण्याची वेळ आली.
 
‘सबसे कातील, गौतमी पाटील’ असे पोस्टर झळकत असलेल्या कार्यक्रमात काही तरुणांनी धुडगूस घातला यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. हा प्रकार घडल्यावर गावातील काही महिलांनी हातात काठ्या घेऊन हुल्लडबाज तरुणांना चोप दिला आहे. मात्र तरुणांचा गोंधळ सुरूच राहिला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
ती अश्लील नृत्य करत असल्याचा अनेकांनी आरोप केला असून तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी देखील केली होती. दरम्यान तिच्या कार्यक्रमात काही तरुणांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. गौतमीच्या प्रत्येक गाण्यात तरुण धुडगूस घालत होते यामुळे कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आला.
पुढील लेख
चीनच्या 'Spy बलून' वरून अमेरिकेत गोंधळ, चिनी घुसखोरीचा नवा मार्ग?