शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (11:25 IST)

कुलरने घेतला तरुणीचा जीव, भंडाऱ्यातील घटना

कोणाचं मरण कधी आणि केव्हा येईल हे सांगणे अवघडच नाही तर अशक्य आहे. घरात काम करताना एका तरुणीला कुलरमुळे मरण आलं. ही घटना आहे महाराष्ट्राच्या भंडाऱ्या जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याच्या पाहुणगावातील आहे. घराची फरशी साफ करताना कुलरचा धक्का लागून एका तरुणीचा दुर्देवी अंत झाला. सुचिता धनपाल चौधरी(22) असे या मयत तरुणीचं नाव आहे. 

दररोज प्रमाणे घराची साफ -सफाई करताना कुलरच्या जवळच्या भागाची फरशी पुसताना कुलर मधून तिला विजेचा धक्का लागल्याने ती जागीच कोसळून बेशुद्ध झाली तिला तातडीनं ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी नंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळतातच लाखांदूर पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदणी केली असून प्रकरणाची चौकशी करत आहे. सुचिताच्या आकस्मिक मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.