मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (13:19 IST)

उन्हाळ्यातील कुलर ने घेतला आजोबा आणि नातवाचा जीव

The summer cooler took the lives of grandparents and grandchildren Nahik news mahad news baaglan news grand parents death grandchildren death news sonavane family news उन्हाळ्यातील कुलर ने घेतला आजोबा आणि नातवाचा जीव
सध्या प्रचंड उकाडा आहे. तापमानात वाढ होत आहे. राज्यात उष्णतेची लाट  सुरु आहे. नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. प्रत्येक घरात कुलर आणि एसी सर्रास वापरले जात आहे. उकाड्यापासून वाचण्यासाठी घरा-घरात लावलेला कुलर आता जीवघेणा ठरत आहे. कुलरची थंड हवा नाशिकच्या महड येथे बागलाण तालुक्यात सोनावणे कुटुंबासाठी जीवघेणी ठरली.  या कुलरच्या हवेमुळे कुटुंबातील आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे. 
 
नाशिक जिल्ह्यातील महड मध्ये बागलाण तालुक्यात सोनावणे कुटुंबात उकाड्यापासून वाचण्यासाठी आणि घरात थंड हवा मिळण्यासाठी कुलर लावला. थंड हवा तर मिळाली पण थंड हवेसोबतच घरात ठेवलेलं ठेवलेला कीटनाशक द्रव्य औषध देखील खोलीत पसरला. त्यामुळे सोनावणे कुटुंबात चोघांची तब्बेत बिघडली.

सर्वप्रथम कुटुंबातील 14 वर्षाच्या मुलाची तब्बेत बिघडली नंतर एक दोन दिवसातच घरातील 68 वर्षाच्या आजोबांची तब्बेत बिघडली. त्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले .उपचाराधीन असता त्या दोघांची प्राण ज्योती मालवली. तर आई आणि मुलगी हे दोघे देखील रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून आजोबा आणि नातवाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी नमुने पुणे येथे पाठवले आहेत. डॉक्टरांना त्यांची तपासणी करता त्यांच्या शरीरात मँगनीज आणि टिन जास्त प्रमाणात आढळले. कुटुंबातील सर्वानीच कुलरची थंड हवा घेतली तर घरातील मोठी मुलगी आणि आजी सुखरूप कसे असा प्रश्न उद्भवत आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहे.