सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (10:20 IST)

उकाड्या पासून दिलासा ! वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

mumbai rain 2
देशात सध्या उष्णतेची लाट सुरु असताना महाराष्ट्राच्या काही राज्यात उन्हाचे चटके नागरिकांना बसत आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. राज्यातील कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ ,सावंतवाडी, दोडामार्गाच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. 
 
राज्यात झालेल्या या अवकाळी पावसामुळं नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या राज्यात उन्हाचा पारा वाढून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. 
पण एन उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली.