शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (09:06 IST)

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 200 रुपयांचं अनुदान

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने 200 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
 
रिकव्हरी रेट जिथे 10 टक्क्यांच्या खाली असेल तिथले ऊस उत्पादक यासाठी प्रयत्न असणार आहेत. ऊस वाहतूक 50 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर प्रति किलोमीटर 5 रुपयांचं अनुदानसुद्धा राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे. राज्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे, याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.