दिवाळी आधी कोरोना निर्बंध शिथिल होणार
करोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राइड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राइड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यावेळी लहान मुलांच्या डॉक्टरांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील २२ ऑक्टोबर पासून सुरू होतील, असे स्पष्ट करण्यात आले.
मुंबईत दुकानं तसेच हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या विषयाबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर मुंबई वगळता इतर शहरातील दुकाने तसेच हॉटेल्स संदर्भात स्थानिक प्रशासनाला योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.