बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (12:36 IST)

व्यापारी बांधवांसाठी आनंदाची बातमी : यंदा दिवाळीचे फटाके 5 ते 10 टक्क्याने महागणार

यंदाच्या वर्षी दिवाळीतील फटाके महागणार. व्यापाऱ्यांच्या मते,गेल्या दोन वर्षात फटाके न विकल्यामुळे खूप नुकसान झाले आहे.परंतु यंदाची दिवाळी व्यापाऱ्यांसाठी आनंद घेऊन येणारी आहे. या वेळी फटाके 10 ते 12 रुपयांचे विकले जाणार फटाक्यांच्या किमतीत 5 ते 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ग्रीन फटाके हे महाग होतील कारण हे धूर आणि प्रदूषण कमी करणारे फटाके आहेत. आणि त्यामध्ये लागणारे रसायन परदेशातून मागवले जातात.या कारणास्तव फटाके महागणार.कोरोनामुळे कित्येक लोकांनी आपले व्यवसाय बदलले त्यामुळे फटाक्यांची खरेदी यंदा कमी आहे. आणि जे विक्रेते आहे त्यांनी फटाक्यांच्या किमतीत वाढ केली आहे. या मुळे यंदाच्या वर्षी फटाके महागणार .