सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (11:13 IST)

पेट्रोल-डिझेलने गाठला उच्चांक

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. डिझेलचे दरही 14 ऑक्टोबर रोजी 93.52 रुपये प्रति लीटरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. दिल्लीत तेलाच्या किंमती 35 पैशांनी वाढल्या. त्याचबरोबर मुंबईत पेट्रोल 110.75 रुपये प्रति लीटर झाले आहे. ताज्या दरवाढीमुळे पेट्रोलची किंमत आता दिल्लीमध्ये 104.44 रुपये प्रति लीटरवरून 104.79 रुपये झाली आहे.महाराष्ट्राच्या राजधानीत डिझेलची किंमतही वाढून 101.40 रुपये प्रति लीटर झाली आहे.  
 
कोलकातामध्ये इंधनाचे दरही वाढवण्यात आले, जिथे पेट्रोल आणि डिझेलची किंमत आता अनुक्रमे 105.43 रुपये आणि 96.63 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईमध्ये लोकांना एका लिटर पेट्रोलसाठी 102.10 रुपये खर्च करावे लागतात, तर तामिळनाडूची राजधानी डिझेलची किंमत 97.93 रुपये प्रति लीटर आहे. स्थानिक करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात.