मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (09:55 IST)

मोदी सरकारचा निर्णय : सणासुदीच्या काळात तेल स्वस्त होणार

स्वयंपाकाच्या तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलांवरील सीमाशुल्क कमी केलं आहे. केंद्राच्या निर्णयामुळे दशांतर्गत बाजारपेठेत खाद्य तेलांच्या किमती कमी होतील. पाम, सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या शुल्कातील कपात गुरुवारपासून लागू होणार आहे. 
 
या कपातीमुळे, आरबीडी पामोलिन, रिफायन्ड सोयाबीन तेल आणि रिफायन्ड सूर्यफूल तेल यावर प्रभावी शुल्क 14 ऑक्टोबरपासून 19.25 टक्के (35.75 टक्के आधी) असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.