बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 जून 2022 (21:50 IST)

छगन भुजबळ यांना कोरोनाची बाधा

chagan bhujbal
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. भुजबळ म्हणाले, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क लावा आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.