1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (08:20 IST)

डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह चौघांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने दिला मोठा आदेश

Court grants bail to four including Dr.Visakha Shinde डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह चौघांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने दिला मोठा आदेश Maharashtra News Regional Marathi anews
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. विशाखा शिंदे यांच्यासह चौघांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाचा आदेश दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि  परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांच्या वतीने ऍड. महेश तवले तर विशाखा शिंदे यांच्या वतीने ऍड. योहान मकासरे यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्या वतीने ऍड,.अनिल ढगे यांनी बाजू मांडली या गुन्ह्याचे तपास अधिकारी संदीप मिटके यावेळी हजर होते.
एडवोकेट महेश चौगुले यांनी बाजू मांडताना सांगितले की जेव्हा घटना घडली त्यावेळी या प्रकरणातील शिंदे पठारे आणि त्यांना आनंद यांनी वॉर्डमधील रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
तसेच कंत्राटी कामगार असल्यामुळे आस्मा शेख व त्यांना आनंद यांचा कार्यकाल संपल्यानंतरही मदतनीस म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या आदेशामुळे कामावर हजर होते त्यामुळे या प्रकरणात यांचा कोणताही दोष नाही. तर युवान मकासरे यांनी बाजू मांडताना सांगितले की या प्रकरणातील विशाखा शिंदे या शिकाऊ डॉक्टर असून त्या या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आल्या आहेत त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी आदी त्यांचे आरोग्य अधिकारी म्हणून निलंबन केले होते. 
मात्र त्यांची चूक लक्षात येताच निलंबन रद्द केल्याचा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे या प्रकरणात जामीन मिळावा अशी मागणी केली सरकारी वकील अनिल ढगे यांनी या जामीन अर्जावर आक्षेप घेत जमिनीला तीव्र विरोध दर्शवला. तर संदीप मिटके यांनी काही अटी शर्तींवर जामीन दावा अशी मागणी न्यायालयाकडे सादर केली होती दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्या नंतर न्यायालयाने चार आरोपींचा जामीन अर्ज काही अटी शर्तींवर जामीन मंजूर केला पोलिसांना सहकार्य करणे आणि जिल्हा न सोडण्याच्या अटीवर न्यायालयाने आरोपींना जामीन दिला आहे.