1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (21:24 IST)

एसटी चालकाने कमी पगारामुळे केली आत्महत्या

नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आगारातील एका एसटी चालकाने कमी पगारामुळे आत्महत्या केली आहे. गहिनीनाथ गायकवाड, असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गायकवाड यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. दुसरीकडे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन अजून तीव्र केले आहे.                                   
 
नाशिक आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले असून, त्यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या 51 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे. आतापर्यंत 85 हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आता नोटीस पाठविलेल्या कर्मचाऱ्यांना चोवीस तासांच्या आत कामावर या, अन्यथा कारवाई करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. यातच अनेक कर्मचारी कमी पगार आणि घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आत्महत्येसारख पाउल उचलत आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात गेल्या 11 दिवसांपासून  13 डेपोंची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.