1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. crime

आंतरजातीय विवाह केला म्हणून नवविवाहितेचा खून

crime
प्रेम प्रकरणातून १३ दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या २१ वर्षीय नवविवाहितेचा राहत्या घरी कु-हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. सदरची घटना बुलडाणातील निमखेड गावात घडली. सदर खून हा नवविवाहितेच्या वडिलांनीच केला असल्याचा संशय आहे. यात गणेश गजानन हिंगणे (२७) व मनिषा बाळु हिवरे (२१) या प्रेमीयुगलाचे नाव असून  २६ मार्च रोजी मंदिरात प्रेमविवाह केला होता.  दुपारी गणेश हिंगणे हा कामानिमित्त बुलडाणा तर त्याचे वडील गजानन हिंगणे हे दाताळा येथे बँकेत गेले होते. तर गणेशची आई कापूस वेचणी करिता शेतात गेलेली असल्याने मनिषा घरी एकटीच होती. याचवेळी तिचा निर्घृण खून करण्यात आला. 
पुढील लेख
आयपीएलचे शानदार उद्घाटन संपन्न