मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: औरंगाबाद , गुरूवार, 27 एप्रिल 2017 (21:15 IST)

साल्याने काढला मेहुण्याचा काटा

crime
बहिणीच्या पतीने शेतात हिस्सा माघितला म्हणून सख्या भावाने आपल्या मेव्हण्याचा काटाच काढला.
 
मेव्हण्याचा काटा काढणाऱ्या भावाला व त्याच्या २ मित्रांना खुलताबाद पोलिसांनी अटक केली आहे. कचरूसिंग गुलचंद महेर ( ६० ) असे मयत मेहुण्याचे नाव आहे. 
 
तसेच अटक केलेल्या भारत बन्सी बारवाल ( २५ रा. पळसगाव ता. खुलताबाद ), किरण हरिभाऊ ताजे ( २४ ), दीपक अशोक बागुल ( २१ ), असे आरोपींचे नावे आहेत. यातील भारत बारवाल हा मयत कचरूसिंग यांचा सख्खा साला आहे. 
 
हा दिनांक २० एप्रिल रोजी कचरूसिंग महेर हे मोटायसायकल वरून नातेवाईकाचे लग्न लावून माघारी येत असताना लिहाजहांगीर शिवारात गट क्र. ३२१ मध्ये आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने पोटावर वार करून खून केला. 
 
या घटनेची माहिती खुलताबाद पोलिसांनी समजल्यावर त्यांनी तात्काळ घटना स्थळी जात आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. 
 
आज स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. कांचनकुमार चाटे यांना खबऱ्यामार्फत महित्यी मिळताच त्यांनी सापळा रचत त्यांना आरोपींना अटक केली. तसेच त्यांनी, मयत कचरूसिंग यांनी शेतात वाटा माघितला म्हणून त्यांचा खून साथीदारांच्या मदतीने केल्याचे काबुल केले.