सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुणे : मुलानेच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या

पुण्यातील मध्यवस्थीत मुलानेच आई-वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. प्रकाश क्षिरसागर (६०) आणि आशा क्षिरसागर (५५) असे हत्‍या झालेल्‍या पती पत्‍नीची नावे आहेत. तर, पराग क्षिरसागर असे हत्‍या केलेल्‍या संशयित मुलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली आहे. 

आई-वडिलांची हत्‍या केल्यानंतर परागने स्वतः हातावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवार पेठ मधील पाठे हाईट्समध्ये घडलेली घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. परागने वडिलांवर काचाने वार करून त्‍यांचा खून केला. त्यांनतर आईचा गळा दोरीने आवळून खून केला.