मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: चिंचवड , सोमवार, 3 एप्रिल 2017 (10:56 IST)

एकतर्फी प्रेमातून वाकडमध्ये विद्यार्थीनीची बोटे कापली

crime in vakad
वाकड येथील बालाजी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून एका विद्यार्थीनीवर सोमवारी (दि. ३) सकाळी नऊच्या सुमारास सत्तूरने प्राणघातक हल्ला केला. वाकडच्या बालाजी सोसायटीत हा प्रकार घडला. या हल्ल्यात मुलीच्या हाताची बोटे कापली गेली आहेत. हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
राजेश बक्षी (वय २३, रा. मूळ हरियाणा) असे हल्लेखोर विद्यार्थ्याचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश आणि हल्ला झाललेली विद्यार्थीनी बालाजी महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत आहेत. राजेशने एकतर्फी प्रेमातून सोमवारी सकाळी संबंधित विद्यार्थीनीवर सत्तूरने हल्ला केला. त्यात तिची बोटे कापली गेली असून, ती गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने विद्यार्थीनीची बोटे शरीरापासून वेगळी झालेली नाहीत. हल्ला करणाऱ्या राजेशला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच जखमी मुलीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वाकड पोलिस तपास करत आहे.