1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (21:13 IST)

ठाकरे सरकार हिंदू रक्षक की भक्षक नगरमध्ये भाजपाच्या बड्या नेत्यांची टीका

Criticism of big BJP leaders in Thackeray government
मुंबईत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यास आणि नामकरणास विरोध करणारे ठाकरे सरकार हे हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या टिपू सुलतानचे नाव देण्यास विरोध करत नाही. त्यामुळे ठाकरे सरकार हे हिंदू रक्षक आहे की, भक्षक आहे, असा प्रश्न पडला आहे. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित करून भाजप टिपू सुलतानाच्या नावाला विरोध कायम करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
आमदार शेलार हे अहमदनगर शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्या पुढाकारातून या उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मुंबईतील मालाड येथील उद्यानाला टिपू सुलतानचे नाव मुंबई महापालिकेने मंजूर केले आहेे. या मुद्द्यावर आमदार शेलार यांनी आक्रमकपणे प्रतिक्रिया मांडली. उद्यानाला टिपू सुलतान नामकरणाला भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने जोरदार विरोध केला आहे.