शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (21:03 IST)

नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्येच थंडीचा कहर का?, जाणून घ्या कारण!

आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांचे संशोधन
नाशिक : प्रतिनिधी
निफाड येथे नाशिक मधील निच्चांकी तापमानाची नोंद नेहमी असे का होते ? याच्या कारणांचा वैज्ञानिक अभ्यास आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी केला. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्राॅपीकल मेटीओराॅजी (आयआयटीएम) पुणेचे माजी हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे हे सध्या नाशिक मधील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संशोधनात प्राध्यापक किरणकुमार जोहरे यांनी केलेल्या शास्त्रीय संशोधनातून पुढील वैज्ञानिक निष्कर्ष त्यांना निफाड बाबत मिळालेत.
 
१. निफाड हा समुद्र सपाटीपासून ५६९ मीटर उंचीवरील सखल भूभाग असून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे उंच डोंगर किंवा पर्वत नाहीत.
२. निफाड मधील समतल भागावर हवेची घनता हि जास्त आढळून येते, याठिकाणी हवेचा थर साठून राहतो.
३. जास्त घनतेची हवा हि जास्त दाबाचा भाग बनविते.
४. जास्त दाबाचा भाग म्हणजेच कमी तापमान असे सूत्र आहे परिणामी निफाडचे तापमान नाशिक मध्ये नेहमीच कमी आढळते.
५. या व्यतिरिक्त निफाड मध्ये हिरवीगार झाडे आणि बागायती शेतीची पिके (द्राक्ष, ऊस, कांदा, गहू, डाळिंब) यांची रेलचेल आहे जी निफाड मध्ये जास्त दाबाचा हवेचा थर टिकून ठेवते.थंड हवेमुळे आणि काळ्या कसदार जमिनीमुळे निफाड मध्ये दीपावलीनंतर लागवड होणारा रब्बी हंगामातील गहू देखील चांगल्या प्रकारे पिकतो.
६. निफाड मध्ये वाऱ्यांची गती देखील कमी आढळते जी तापमान कमी ठेवण्यास पूरक आणि महत्वाचा भाग ठरते.
७. निफाडला गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र लाभले आहे. त्यामुळे मोठा जलसाठा जमिनीत होतो. निफाड मध्ये पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे जी जमिनीचे तापमान कमी ठेवण्यास उपयोगी ठरतो आणि परिणामी हवेचे तापमान देखील घटते.
८. निफाड मध्ये आकाश निरभ्र असते त्यामुळे दिवस जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता लवकर हवेत फेकली जाते आणि जमिनीलगतचा तापमान वेगाने घटते आणि थंडी वाढते.