बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (21:02 IST)

तरुणाचा अनैतिक संबंधातून खून, एलसीबीकडून गुन्हा उघड

जळगाव शहरातील ममुराबाद रोडवर गुरुवारी शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५ रा. उस्मानियॉ पार्क) या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान, अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अवघ्या आठ तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकरांच्या मुसक्या आवळल्या. शेख शाबीर शेख सूपडू (वय-३३) आणि शेख फारूख उर्फ छोटू शेख शौकत (वय-२१) दोन्ही रा. श्रीरामपेठ जामनेर असे संशयित आरोपींचे नाव आहे.
 
काय आहे घटना?
गुरुवारी ममुराबाद रोडवर उस्मानियॉ पार्क येथील रहिवाशी शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) या तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. मयत शेख गफ्फार याचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती. दरम्यान सायंकाळी मृतदेहाचे शवच्छेदन केल्यानंतर गळा आवळून खून केल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले होते. त्यानुसार गुरूवारी २७ जानेवारी रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
या गुन्ह्याचा मारेकऱ्यांचा तपासासाठी पोलीस कर्मचारी रवाना झाले होते. यात शेख शाबीर शेख सुपडू (वय-३३) रा. श्रीरापेठ जामनेर याला चौकशी साठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता मयत शेख गफ्फार याची पत्नी आणि संशयित आरोपी शेख शाबीर याचे अनैतिक संबंध असल्याचे कबुल केले. दोघांच्या संबंधाबाबत मयत शेख गफ्फार याला समजले होते. यासाठी त्याचा काटा काढण्यासाठी संशयित आरोपी शेख शाबीर शेख सपडू याने सहकारी शेख फारूख उर्फ छोटू शेख शौकत (वय-२१) रा. श्रीरामपेठ जामनेर यांनी कारने येवून २६ जानेवारी सायंकाळी शहरातील सुभाष चौकातून उचलले. त्यानंतर कारमध्ये घेवून ममुराबाद रोडवर सुतीच्या दोरीने गळफास देवून ठार केले.अवघ्या आठ तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकरांच्या मुसक्या आवळल्या.