मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (12:55 IST)

ठाणे येथील भिवंडीत वयोवृद्ध दाम्पत्याची हत्या

murder
ठाणे येथील भिवंडीत बाळू पाटील आणि त्यांची पत्नी सत्यभापा पाटील या दांम्प्त्यांची घरात घुसून धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या दोघांवर धारधार शस्राने वार करुन आरोपींनी पळ काढला आहे. सदर घटना पेंढरीपाडा येथे घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर या वृद्ध दांम्प्त्याची हत्या का करण्यात आली यामागी सत्य अद्याप समोर आलेले नाही. परंतु पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु केला आहे.
 
घराचा दरवाजा खुला असल्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना संशय आला. त्यांनी पाहणी केली असता, दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले होते. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. भिवंडीतील गणेशपुरी पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. या वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.