शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (16:05 IST)

भिवंडीत कापड कारखान्याला भीषण आग, कोट्यवधींची मालमत्ता जळून खाक

महाराष्ट्रातील ठाण्याच्या भिवंडी परिसरातील काजी कंपाऊंडमधील बंद कापड कारखान्याला रविवारी रात्री भीषण आग लागली . या आगीत कोट्यवधींची मालमत्ता जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे  अनेक बंब  घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप काहीही माहिती मिळाली नाही. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात ठाण्यातील भिवंडी परिसरात एका गोदामाला भीषण आग लागली होती. या अपघातात तीन जण गंभीररित्या भाजले. आग इतकी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.