सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : सोमवार, 17 जानेवारी 2022 (12:19 IST)

IITच्या विद्यार्थ्याची होस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

IIT students commit suicide by jumping from seventh floor of hostel Marathi Mumbai News IN Webdunia Marathi
IIT मुंबईत राहणाऱ्या 26 वर्षीय विद्यार्थ्याने होस्टेल च्या7 व्या मजलीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दर्शन असे या मयत विद्यार्थांचे नाव असून तो मध्यप्रदेशातील रहिवासी होता. दर्शन  हा  IIT  मुंबईत  पदव्युत्तर चे शिक्षण घेत असून  दुसऱ्या वर्षांचे शिक्षण घेत होता . त्याने सकाळी होस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली .त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले . डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या रुममधये एक सुसाईड  नोट सापडली असून त्यात त्याने नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले आहे त्याच्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही . असे सुसाईड  नोट  मध्ये लिहिले आहे.  तो नैराश्याने ग्रसित होता आणि त्यासाठी त्याच्यावर वैद्यकीय उपचार देखील सुरु होते. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेमुळे हॉस्टेल मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे .