गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जानेवारी 2022 (10:18 IST)

पुण्यात कारमधून उतरताच बाप-लेकाची हत्या, 5 - 6 जणांच्या टोळक्याकडून कोयत्याने वार

father and son murdered while getting out of car in Pune
पुणे : लोणीकंद येथे बुधवारी रात्री बाप-लेकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपीचा व त्याच्या वडिलांचा खून केल्याची घटना सातवाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी लोणींकद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी कुमार शिंदे (वय 22) आणि कुमार मारूती शिंदे (वय 55, दोघेही रा. शिंदे वस्ती, लोणीकंद) अशी खून झालेल्या बापलेकांची नावे आहेत. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सचिन शिंदे या तरुणाचा खून झाला होता. सनी शिंदे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तो तीन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला  असून बुधवारी रात्री त्याच्या कारमधून तो आणि त्याचे वडील लोणीकंद येथून शिंदे वस्ती कडे निघाले होते. त्यावेळी सफारी कारमधून 5 ते 6 जण आले आणि त्यांनी सनी शिंदे याला अडवलं. टोळक्याकडून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार सुरू केले गेले.
 
सनीला वाचविण्यासाठी वडील कुमार शिंदे मध्ये आले. त्यावेळी टोळक्याने त्यांच्यावर देखील वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर टोळके पसार झाले.