सायबर ठगी : जाहिरातीला भुलून फोन केला आणि तीनशेची थाळी पडली लाखाला
सध्या ऑफरला भुलून ग्राहक सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकल्याच्या अनेक घटना घडत आहेत. हे सायबर भामटे गंडवून लाखो रुपये चटकन अकाउंट मधून उडवून घेतल्याच्या घटना घडतातच . असाच काही प्रकार औरंगाबाद येथे घडला आहे. फेसबुकवरील जाहिरात बघून दिलेल्या क्रमांकावर फोन करणे एकाला महागातच पडले. हा प्रकार सप्टेंबर महिन्यात घडला आहे. बाबासाहेब पंढरीनाथ ठोंबरे असे या फिर्यादीचे नाव आहे. यांचा स्क्रेपच्या व्यवसाय आहे. 24 सप्टेंबर रोजी फेसबुक पाहताना त्यांना शाहीभोज रेस्टारेंटची जाहिरात दिसली त्यात 'बाय वन गेट टू फ्री ' अशी जाहिरात दिसली. त्या जाहिरातीत थाळी बुक करण्यासाठी एक मोबाईल नंबर देखील दिलेला होता. त्या नंबर वर ठोंबरे यांनी फोन लावला. समोरून ऑनलाईन बुकिंग करण्याचे सांगण्यात आले. त्यांनी ऑनलाईन सर्व माहिती दिली तसेच ते वापरत असलेल्या क्रेडिट कार्डाची माहिती देखील त्यांनी दिली. त्यानंतर त्यांना ओटीपी क्रमांक विचारण्यात आले. त्यांनी ओटीपी क्रमांक देतातच त्यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून दोन वेळा 49 हजार 490 रुपये काढले गेले. असे त्यांच्या खात्यातील एकूण 89 हजार 490 रुपये काढले गेले. त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले त्यांनी ताबडतोब घडलेल्या प्रकरणाची माहिती एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणात दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे करत आहे. दरम्यान जून महिन्यात भोज थाळी रेस्टारेंटचे मालक अशोक अगरवाल , अंकित अगरवाल आणि सतीश अगरवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही फेसबुकवर कुठलीही जाहिरात करत नसल्याचे सांगितले होते. अशी जाहिरात आली तर ती फसवेगिरीचा प्रकार असल्याचे समजावे.
सायबर पोलिसांकडून वारंवार आपले खाते नंबर किंवा एटीम सीव्हीव्ही पिन, ओटीपी कोणालाही सामायिक करू नये असे सांगून देखील ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडत आहे. ग्राहकांनी सावधगिरी बाळगा. अशा जाहिरातींना भुलू नका.