ठेवीदारांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे पोलिसांकडे तक्रार देणा-या ठेवीदारांचा ओघ सुरू झाला आहे. बुधवारी तब्बल २५८ जणांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. दरम्यान, डी.एस. कुलकर्णी यांच्या विरुद्ध आलेल्या प्रचंड तक्रारीनंतर गुरुवारी सकाळपासून पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने डी.एस.के यांच्या पुणे शहरातील 4 व मुंबईतील एका ठिकाणावर छापा घातला आहे. या ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे.
मात्र यावेळी डी. एस. कुलकर्णी घरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. ठेवीदारांच्या ज्या तक्रारी आल्या आहेत, त्यादृष्टीने कागदपत्रे व पुरावा हस्तगत करण्यासाठी हे शोधमोहीम सुरू करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.