शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (09:57 IST)

Dadar : दादर रेल्वे स्टेशन वर धावत्या ट्रेन मधून तरुणीला फेकलं , आरोपीला अटक

मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेन मधून तरुणीला फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेस मधून एका तरुणीला  लेडीज डब्यातून रात्री 8:30 च्या सुमारास फेकल्याची घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या या आरोपीने तरुणीला फेकलं असून ती जखमी होऊन बेशुद्ध झाली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, दादरच्या रेल्वे स्थानकावर उद्यान एक्स्प्रेस आली. या ट्रेनच्या जनरल लेडीज डब्यातील सर्व महिला उतरल्या मात्र पीडित तरुणी एकटीच डब्यात होती. 

तरुणीला एकटे पाहून आरोपी डब्यात शिरला त्याला डब्यात शिरलेल पाहता तरुणीने प्रतिकार केला. दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने तिला झटापटीतून धावत्या रेल्वेतून खाली फेकून दिले. सुदैवाने ती प्लॅटफॉर्म वरच पडली. तिला जखम झाली असून ती बेशुद्ध पडली. या प्रकरणी आरोपीचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे रेल्वे मध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.  
 





Edited by - Priya Dixit