सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (08:51 IST)

संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांचा डान्स व्हायरल, विरोधकांची टीका

फोटो साभार -सोशल मीडिया 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी राऊत लग्नबंधनात अडकणार आहे. या सोहळ्याआधी राऊत कुटुंबाकडून मुंबईत संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमातील संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या डान्स व्हिडिओची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा होत आहे.
या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी आग्रह करत संजय राऊत यांना एका गाण्यावर ठेका धरण्यास भाग पाडलं. सुळे यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही नृत्यात सहभागी व्हायला लावल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
दरम्यान, विरोधकांनी सुळे आणि राऊत यांच्या डान्स करण्यावर टीका केली आहे.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं, "एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता.
"एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?"