दापोलीत आंबाबागेतील वणव्यात कोट्यवधींचे नुकसान दुसऱ्या दिवशीही धुमसतोय वणवा; पंचनाम्याची प्रतीक्षा
मौजे दापोली :दापोली तालुक्यातील आडे-पाडले येथे गुरूवारी लागलेल्या भीषण वणव्यात हातातोंडाशी आलेल्या आंबा, काजाया बागा खाक झाल्या आहेत. या वणव्या पांनामा झाला नसला तरी यात एक कोटी नुकसान झाल्या अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. हा वणवा दुसऱ्या दिवशीही धुमसत होता.
गुरूवारी आडे-पाडले येथे वणवा लागल्याचे निदर्शनास येताच खेड येथील पाण्याच्या बंब मागविण्यात आला. आग आटोक्यात आणण्यात यश आले तरी आग पूर्णत: विझलेली नसून पुन्हा रौद्र रूप धारण करण्याची भिती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे वणव्यापासून लांबच्या ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या 2 महिन्यांपासून दापोली तालुक्यात वणव्याचे प्रकारे वाढत आहेत. वणवा नैसर्गिक आपत्ती मानली जात नसल्याने नुकसान भरपाईदेखील मिळत नसल्याने नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक संकटात फसत आहेत. आडे-पाडले येथील वणव्यात कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा, काजूवर वर्षभरे आर्थिक गणित मांडणारे येथील शेतकरी संकटात सापडले आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor