गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (21:18 IST)

वाढता स्क्रीनटाईम सर्वांनाच धोकेदायक - डॉ. संपदा तांबोळकर यांचे प्रतिपादन

Increasing screen time is dangerous for everyone  Dr. Assertion by Sampada Tambolkar  Pediatrician Dr. Sampada Tambolkar  Maharashtra University of Health Sciences
नाशिक: - वाढता स्क्रीन सर्वांना धोकेदायक असल्याचे प्रतिपादन बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभात अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत पुणे येथील डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या प्राध्यापिका, बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमास व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे, मतनिसच्या अध्यक्षा श्रीमती योगिता पाटील, सचिव श्रीमती शिल्पा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
 
याप्रसंगी समृध्द पालकत्व विषयावर मार्गदर्शन करतांना डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या प्राध्यापिका व बालरोगतज्ज्ञ डॉ. संपदा तांबोळकर यांनी सांगितले की, महिलांनी कुटुंबाची काळजी घेतांना मुलांवर अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. सध्या मोबाईलचा वाढता वापर सर्वांनाच घातक ठरणार आहे. विशेषतः लहान मुलांच्या बुध्दीमत्तेवर आणि मानसिकतेवर घातक परिणाम करत आहे. याकरीता सर्वांनी स्क्रीन टाईम कमी करणे आवश्यक आहे. विशेषतः पालकांनी याबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
 
त्या पुढे म्हणाल्या की, मुलांना संतुलीत आहार गरजेचा असून त्यासाठी रोजच्या स्वयंपाकात विविध जीवनसत्व, प्रथिन व कार्बोहाड्रेटस् असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. पॅकिंग फुट खाणे शक्य झाल्यास टाळावे. तरुण वयात येणाÚया मुलांची व मुलींची मानसिकता पालकांनी ओळखणे गरजचे आहे. या वयात वाईट व्यसनं लागण्याची शक्यता अधिक असते. यासाठी मुलांसमवेत दररोज काही वेळ घालवावा अन्य विषयांवर चर्चा करावी. सामाजिक बांधिलकी, आज्ञाधारकपणा व वक्तशीरपणा यांचे रोपण करावे तर पुढील पिढी वरिष्ठांचा आदर करेल. यासाठी घरातील महिलानांनी अधिक सजग व दक्ष राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरून बोलतांना विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) सांगितले की, समाजाला पुढे नेण्यासाठी स्त्री शिक्षणाबरोबर त्यांचा सन्मान झाला पाहिजे. ’संशोधन तंत्रज्ञान याचा उपयोग लिंगभाव समानतेसाठी’ असा या वर्षाच्या जागतिक महिला दिनाची थीम आहे. या अनुषंगाने महिलांनी टेक्नॉलॉजी अणि ऑनलाईन क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी असे त्यांनी सांगितले. महिला आर्थिक, वैचारीकरित्या स्वावलंबी आणि सक्षम होण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी महिलांच्या उपक्रमांना पाठींबा देणे गरजेचे आहे. यासाठी स्त्री-पुरुष समानता जोपासण्यात यावी. महिलांना सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे. समाजातील महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित आहे. योग्य वर्तन व ज्ञानसमृद्धी होण्यासाठी वाचन व क्रीडा संस्कृती जोपासली पाहिजे तरच महिलांसह समाज सक्षम होईल असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्राबरोबर अवकाश संशोधन, तंत्रज्ञान, औषध, कला व उद्योग आदी क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे. आपल्या संस्कृतीत महिला व मातांचा आदर करण्यात येतो. महिलांचे कर्तृत्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. महिला प्रत्येक कामात निपुण असतात. विद्यापीठातर्फे राबविण्यात येणाÚया उपक्रमांत मुलींना व महिलांना काम करण्याची समान संधी देण्यात. आपल्या कुटुंबापासूनच सर्वांचा आदर व सन्मान करण्याची शिवकण मुलांना व विद्यार्थ्यांना द्यावी तरच प्रेरणादायी समाज निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.


याप्रसंगी विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, थोर स्त्रियांचे विचार, चरित्र कायम स्मरणात ठेवा व त्यानुसार वागा.  वाचन, लेखन आदी छंद जोपासून नेहमी आनंदी रहा. कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी आपल्या कामाचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असा चांगला ठसा उमटला असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही.कळसकर यांनी सांगितले की, समाजातील मुली व महिलांचा सन्मान प्रत्येकाने करावा. महिला दिन साजरा करण्याची ही संकल्पना चूकीची नाही मात्र दररोज त्यांचा सन्मान झाल्यास महिला दिन नावाने वेगळा दिवसही साजरा करण्याची गरज भासणार नाही. समाजातील मुली शिक्षीत आणि सुरक्षित राहणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. याप्रसंगी मा. कुलगुरु महोदया यांनी महिला दिनाच्या प्रतिज्ञेने वाचन केले व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मतनिसच्या अध्यक्षा श्रीमती योगिता पाटील यांनी केले. प्रमुख व्याख्यात्या यांचा परिचय श्रीमती रंजिता देशमुख यांनी करुन दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिल्पा पवार यांनी तसेच श्रीमती उज्वला साळुंखे यांनी आभार मानले.

महिला दिनानिमित्त विद्यापीठात रांगोळी स्पर्धा व मॉकटेल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेत श्रीमती आशा वाबळे यांनी प्रथम व श्रीमती शितल शिंदे यांना व्दितीय आाणि श्रीमती ज्योती इटणकर यांनी उपविजेता म्हणून बक्षिस मिळविले. मॉकटेल स्पर्धेत विविध पदार्थापासून हेल्थी ज्यूस तयार करण्यात आले होत यास्पर्धेत श्रीमती कांचन सानप यांनी प्रथम श्रीमती ज्योती कर्नाटकम् यांनी व्दितीय आणि श्रीमती लीना आहिरे यांनी उपविजेता म्हणून बक्षिस मिळाले. श्रीमती शोभना भिडे, श्रीमती शिल्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आले. याकरीता श्रीमती रंजिता देशमुख, श्री. प्रविण घाटेकर,  श्री. सुरेश शिंदे, श्रीमती उज्वला साळुंखे, शैलजा देसाई यांनी परिश्रम घेतले.

Edited By- Ratnadeep Ranshoor