गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (18:15 IST)

हळद लागण्याआधी नवरदेवाचा मृत्यू

death
लग्नाच्या आधी दारी मंडप लागलेला होता. घरात आनंदच वातावरण असताना आनंदावर विरजण पडले आहे. लग्नात हळद लागण्यापूर्वी घरात नवरदेवाचा मृतदेह घरी आला. ज्या घरातून वरात निघणार होती त्या घरात अंत्ययात्रा निघत आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर सागर जिल्ह्यातील बंदरी येथे घडली आहे. दुचाकीला धडक होऊन झालेल्या अपघातात नवरदेवाचा मृत्यू झाला.शुभम सेन  असे या मयत तरुणाचे नाव आहे. शुभम हा रहातगड ब्लॉकचा देवरी गावाचा रहिवासी असून लग्नाच्या खरेदीसाठी बाँद्री मार्केट मध्ये आला होता. रात्री परत येताना ही घटना घडली आहे. घरी सगळी तयारी पूर्ण झाली असताना एकाच क्षणात लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आहे. हळद लागण्यापूर्वी नवरदेवाचा दुर्देवी मृत्यू झाला.या घटनेमुळे दोन्ही कुटुंबात शोककळा पसरली आहे.       
 
 
Edited By - Priya Dixit