गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2023 (07:59 IST)

काय आहे लेक लाडकी योजना जाणून घ्या सविस्तर

devendra fadnavis
मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी “लेक लाडकी’ ही नवी योजना सरकारनं कडून जाहिर करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत पात्र मुलींना ७५ हजार रुपये रोख मिळणार आहेत.
 
फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं की, मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरु करण्यात येईल. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये, इयत्ता चौथीत ४,००० रुपये, सहावीत ६,००० रुपये, अकरावीत ११ हजार रुपये अनुदान दिलं जाईल. लाभार्थी मुलीचं वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.
 
महिलांना निम्म्या दरात एसटी प्रवास
 
तसेच महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास तिकीट दरात सरसकट ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. महिला खरेदीदाराला घर खरेदी करताना १ टक्का सवलत देण्यात आली आहे. सध्याच्या अटीनुसार १५ वर्षांपर्यंत महिलेला पुरुष खरेदीदाराला घराची विक्री करता येत नाही. ही अट शिथील करुन इतर सवलती देण्यात येणार आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor