शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 20 मे 2023 (21:18 IST)

दया नायक आता मुंबई क्राइम ब्रँचमध्ये

daya nayak
एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे दया नायक यांची आता मुंबई क्राइम ब्रँचमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसमधील ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर दया नायक आता मुंबई क्राइम ब्रँचमध्ये रुजू झाले आहेत. याबाबत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
 
महाराष्ट्र एटीएसमधील ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर, आज मी प्रतिष्ठित अशा मुंबई क्राइम ब्रँचमध्ये रुजू झालो आहे. मला अशी आशा आहे की, मी प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करेन आणि माझ्या क्षमतेनुसार मुंबईची सेवा करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, असं ट्वीट दया नायक यांनी केलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor