शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 जानेवारी 2023 (08:40 IST)

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्यासाठी २ मार्च पर्यंत मुदतवाढ

marathi sahitya sammelan
मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२२ करीता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका व पुस्तके पाठविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.  दि. ३१ जानेवारी २०२३ नंतरही एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात आली आहे. अंतिम मुदत दि. २ मार्च, २०२३ असेल.
 
विहित कालमर्यादेनंतर (१ जानेवारी, २०२३ ते २ मार्च, २०२३) येणाऱ्या प्रवेशिका व पुस्तके स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाहीत, असे सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor