1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (09:32 IST)

ट्रिपल सीट जाणाऱ्या मित्रांचा मृत्यू

Three youths died in a horrific accident in Solapur
सोलापूर : सोलापुरात झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महावीर चौक येथे मध्यरात्री दुचाकी झाडाला धडकली. यात तिघेही गंभीर जखमी झाले.  या तिघांना पोलिसांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टरांनी या तिघांना मृत घोषित केलं. या भीषण अपघातानं सोलापूर पुरतं हादरुन गेलं आहे.
 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महावीर चौक रस्त्यावर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास  तीन तरुणांचा भीषण अपघात घडला. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाल्याने या तिघांना पोलिसांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र तिथे डॉक्टरांनी या तिघांना मृत घोषित केलं . इरण्णा मठपती, निखिल कोळी, दिग्विजय सोमवंशी अशी मृत तरुणांची नावं आहेत.  त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच शासकीय रुग्णालयात मित्र आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

Edited By -  Ratnadeep ranshoor