1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जून 2021 (09:46 IST)

'त्या' रुग्णाचा मृत्यू

Death of 'that' patient
मुंबईतल्या घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागातील रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. श्रीनिवास यल्लप्पा असं या रुग्णाचं नाव असून त्याचा  मृत्यू झाला. पण मृत्युचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. श्रीनिवास यल्लपा या २४ वर्षीय रुग्णाला श्वसनाचा त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मेंदूज्वर आणि किडनीचा त्रास असल्याने या रुग्णाला पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.  नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचं दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. डोळ्यांची तपासणी केली असता उंदराने डोळा कुरतडल्याचं समोर आलं.