शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मार्च 2023 (14:11 IST)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

nitin
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे.गडकरींच्या नागपूरमधील कार्यालयात कॉल करून 10 कोटी रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या पूर्वी देखील धमकीचा फोन आला होता. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर कार्यालयात लॅंडलाईनवर धमकीचा फोन आला मंगळवारी सकाळी लँडलाईनवर दोन वेळा कॉल आला. या कॉल मध्ये गडकरींकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली.जयेश पुजारी नावाने हे कॉल आले आहेत. या कॉल नंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलीस आलेल्या कॉलची चौकशी करत आहे. 
Edited By- Priya Dixit