शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मे 2023 (20:36 IST)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

nitin gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी (15 मे) संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नितीन गडकरींच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली आहे. आता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याआधीही गडकरी यांना नागपूर येथील कार्यालयात धमकीचा फोन आला होता.
 
नितीन गडकरी यांना सोमवारी (दि.15 मे) संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
नितीन गडकरी यांच्या कार्यालयात सोमवारी संध्याकाळी एक फोन आला. यावेळी समोरच्या व्यक्तीने आपल्याला केंद्रीय मंत्र्यांशी बोलायचं आहे, असं सांगून धमकी दिली. या प्रकरणाचा दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
 
पाच महिन्यात तिसऱ्यांदा धमकी
दरम्यान, नितीन गडकरी यांना तिसऱ्यांदा धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. याआधी देखील दोनवेळा नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. त्या प्रकरणाचा देखील तपास सुरू असून आता पुन्हा तिसऱ्यांदा धमकीचा फोन आल्यामुळे पोलीस अलर्ट झाले आहेत.