बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 डिसेंबर 2018 (17:37 IST)

मनपा निवडणूक : नगरमध्ये शिवसेना तर धुळे येथे गोटेयांचा पराभव भाजपाची पूर्ण सत्ता

अहमदनगरमध्ये महापालिकेसाठीच्या चौथ्या निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. प्रत्येक क्षणाला आकडे बदलताना पाहायला मिळत आहेत. सध्यातरी शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. या निवडणुकीतील ताजी आघाडी हाती आली आहे.धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी मतमोजणी जवळपास पूर्ण झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून भाजपने आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. भाजपने 50 जागांवर आघाडी घेत बहुमताचा जादुई आकडा पार केला. भाजपने एकहाती सत्ता राखल्यामुळे भाजपने एकच जल्लोष सुरू केला. विशेष म्हणजे, भाजपमध्ये गुंडांना उमेदवारी दिली असा आरोप करून भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी बंड पुकारलं होतं. अनिल गोटे यांनी लोकसंग्राम नावाचा पक्ष स्थापन केला. अनिल गोटे यांनी बंडखोरी केल्यानं धुळे महापालिकेची निवडणूक राज्यभर गाजली. तर नगरची आकडेवारी अशी शिवसेना - 22 ,राष्ट्रवादी - 20, भाजप - 14, कॉंग्रेस - 4, बसप - 4, सपा - 1 ,अपक्ष - 3