1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2017 (11:56 IST)

आरजे मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळ्या, महापालिकेकडून नोटीस

dengue mosquitoes
मुंबई महापालिकेच्या कारभारावर “मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय,” असं म्हणत ताशेरे ओढणाऱ्या आरजे मलिष्काच्या घरी केलेल्या तपासणीत मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांना डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहे.
 

मुंबई मनपाने मंगळवारी मलिष्काच्या वांद्र्यातील पाली नाका इथल्या सनराईज इमारतीमधील घरात तपासणी केली. यावेळी घरातील शोभेच्या कुंडीखालील डिशमध्ये साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. यानंतर महापालिकेने मलिष्काला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी मलिष्कावर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेने बजावलेली पहिली नोटीस आहे. डेंग्यूच्या अळ्या साफ करा, अशा सूचना या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. या नोटीसनंतरही जर डेंग्यूच्या अळ्या साफ झाल्या नाही तर दुसऱ्यांंदा नोटीस बजावण्यात येते. तरीही कोणतीही कारवाई न झाल्यास महापालिकेकडून मलिष्काला दंड ठोठावण्यात येईल.