सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 26 जानेवारी 2025 (10:31 IST)

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध केला

महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बिकट आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने  लाडकी बहिण योजना आणि इतर योजना सुरु करण्यासह आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची तयारी करत आहे. या कारणामुळे भाजप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, आणि अजित पवार यांची एनसीपी महाआघाडी सरकार मध्ये मतभेद वाढू लागले आहे. वित्त विभागाचे प्रमुख अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 
 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने लाडकी बहिण  योजनेची रक्कम 2100 रुपये प्रति महिना, शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून देण्यासह अनेक आश्वासने दिली होती. मात्र शिंदे गट आणि भाजपने निवडणूक जिंकल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासनही दिले होते.
त्यामुळे आता निवडणुकीनंतर शेतकरी आणि विरोधक सरकारकडे निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी करत आहेत. नजीकच्या काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप आणि शिंदे गटही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या मनस्थितीत आहेत. पण राज्याची रिकामी तिजोरी अर्थखात्याची धुरा सांभाळणाऱ्या अजित पवारांना हे करू देत नाहीये. आधीच सुरू असलेल्या योजनांसाठी पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यामुळेच अजित यांनी कर्जमाफीला विरोध केला आहे.
Edited By - Priya Dixit