रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (08:29 IST)

देशमुख, मलिकांनंतर कोणत्या मंत्र्याचा नंबर? किरीट सोमय्यांनी घेतले यांचे नाव

महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर आता अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. ही सर्व कारवाई राजकीय सूडापोटी होत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या नेत्यांनी केला आहे.

मात्र, ही कारवाई ईडीच्या कामकाजाचा भाग असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट करुन खळबळ उडवून दिली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता कोणत्या नेत्याचा नंबर हेच त्यांनी आता स्पष्ट केले आहे. सोमय्या यांच्या ट्विटनुसार, शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा आता पुढचा नंबर राहणार आहे. परब यांना हिशोब द्यावा लागेल, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे.