1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Despite the debate, the trust's decision to keep the temple closed remained

वादविवादानंतरही ट्रस्टने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय कायम

devi saptshringi
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ आणि उत्तर महाराष्ट्रातील कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावरील देवीचे मंदिर मूर्ती देखभाल कामांसाठी 45 दिवस बंद करण्याचा निर्णय सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टने घेतला होता या निर्णयावर अनेक वादविवाद झाल्याचे पाहायला मिळाले या निर्णयावर आक्षेपही घेण्यात आला परंतु या वादविवादानंतरही ट्रस्टने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
21 जून पासून पुढील 45 दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय आता कायमच असल्याची माहिती मंदिर ट्रस्ट कडून मिळाली आहे. भगवती मूर्ती संवर्धन देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरू होते. सद्य:स्थितीत अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने शासनाच्या पुरातत्त्व विभाग आयआयटी पवई मुंबई मे अजिंक्यतारा कन्सल्टन्सी नाशिक यांच्यामार्फत तज्ज्ञ मार्गदर्शन प्राप्त करून भगवती मूर्ती संवर्धन व देखभालसाठी हा निर्णय घेतला आहे. गडावरील मंदिर बंद ठेवण्यासाठी अनेक विरोध झाला परंतु हा विरोध जुगारात मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
त्यामुळे आता 21 जून पासून पुढील 45 दिवस सप्तशृंगी देवीचे मंदिर येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी बंदच राहणार आहे. सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून विश्वस्त संस्थेच्या वतीने भाविकांची दर्शनासाठी गडाच्या पहिल्या पायरीजवळील सप्तशृंगी देवीची हुबेहूब प्रतिकृती भाविकांच्या पर्याय दर्शनाची व्यवस्था म्हणून कार्यरत ठेवली जाणार आहे.
पुढील लेख
कांदा भावात घसरण,११४० रुपये प्रती क्विंटल भाव