शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (08:24 IST)

निसर्गाची, लोकांच्या आरोग्याची व त्यांच्या उपजीविकेच्या साधनांची नासाडी

madhav gadgil
पश्चिम घाट परिसरात जे काही चालले आहे ते म्हणजे वरून लादलेला विकास आणि वरून लादलेले निसर्ग संरक्षण. निसर्गाची, लोकांच्या आरोग्याची व त्यांच्या उपजीविकेच्या साधनांची नासाडी ही याची निष्पत्ती आहे, असे मत जेष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
 
वनराईतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ. माधव गाडगीळ लिखित ‘सह्याद्रीची आर्त हाक: पश्चिम घाट समिती अहवालाचा मथितार्थ’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
 
यावेळी बोलताना पोपटराव पवार म्हणाले, की भविष्यात विकासाच्या नावाखाली निसर्गाला आपण अशाच पद्धतीने ओरबाडत राहिलो तर उत्तराखंड आणि केरळनंतर निश्चितपणे महाराष्ट्राचा नंबर लागेल. गाडगीळ अहवाल आणि कस्तुरंगन अहवाल ही दोन वेगवेगळी टोके आहेत. भविष्यातील नैसर्गिक आव्हानांचा विचार करता शासनाने गाडगीळ अहवालाचा पुर्नविचार करणे गरजेचे आहे.