बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (08:22 IST)

नाशिक: अल्पवयीन मुलास आमिष दाखवून अनैसर्गिक अत्याचार

Unnatural torture by luring a minor
नाशिक  अल्पवयीन मुलास खाण्यापिण्याचे आमिष दाखवून वारंवार अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी नराधमास रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
याप्रकणी मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तत्काळ बाललैगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ४, ६, १२ (पोस्को) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अधिक माहिती अशी की, सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने परिसरातीलच एका अल्पवयीन मुलाशी जवळीक वाढवली होती.
 
खाण्यापिण्याचे आमिष दाखवून संशयित या मुलाला घरी बोलवत होता. त्यानंतर अश्लील व्हिडीओ दाखवून या मुलावर या नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केला. जर मुलाने प्रतिकार तर संशयित त्याला मारहाण करत असे. यानंतर मुलाने हा प्रकार घरी सांगितला.
 
मुलाच्या वडिलांनी तत्काळ सातपूर पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार कथन केला. यानंतर पोलिसांनी तत्काळ पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. २४ जुलै २०२२ रोजी दुपारी गुन्हा दाखल झाल्यानतर पोलीस संशयिताचा शोध घेत होते. दरम्यान, काल (दि ०२) रात्री अकरा वाजेच्या सुमारस अटक करण्यात आली.